Ganeshotsav Decoration Competition

For Home and Society Ganpati

contact@ganeshotsav.org

+91 8806333789
Pune, Maharashtra

वर्ष : २० वे

गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५

घरगुती आणि सोसायटीतील गणपती साठी

दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा जगभर आजही त्याच हिरिरीने जपली जात आहे. या अनुषंगाने ganeshotsav.org ने गणेशोत्सव सजावट स्पर्धा घरगुती आणि सोसायटीतील गणपती साठी आयोजित केली आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात.

या गणेश चतुर्थीला आपल्या घरात आणि सोसायटीत मनमोहक आणि आनंददायी वातावरण निर्माण करूया. गणेशोत्सव साजरा करण्याचा हा आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा क्षण आहे. यावेळी आपल्या गणपतीच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवा.

स्पर्धेचे उद्दिष्ट:

➤ आपल्या घर किंवा सोसायटीत गणेशाच्या मंडपाला मनमोहक, पारंपरिक तसेच सर्जनशील सजावट देणे.
➤ सार्वजनिक बांधिलकी वाढवणे आणि सणाची गोडी वाढवणे.
➤ लोकांना पर्यावरणपूरक व नैसर्गिक सजावटीकडे प्रोत्साहित करणे.

स्पर्धेचे प्रकार:

➤ घरगुती गणेशोत्सव सजावट
➤ सोसायटी गणेश मंडप सजावट

स्पर्धेचे नियम आणि अटी:

✅ सजावटीसाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्य वापरणे प्राधान्य आहे.
✅ सोसायटीत सजावट करताना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
✅ एका घराकडून किंवा सोसायटीकडून एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
✅ स्पर्धे साठी नाव नोंदणी विनामूल्य आहे व ती २७-ऑगस्ट ते ६-सप्टेंबर २०२५ पर्यंत करता येईल.

निर्णायक मंडळ:

परीक्षक स्पर्धकांची गुणवत्ता आणि सर्जनशीलता यावर आधारित निष्पक्ष निर्णय करतील.

स्पर्धेचे पुरस्कार:

🏅 घरचा गणपती सजावट: प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
🏅 सोसायटी गणेशोत्सव सजावट: प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
📋 सहभागी होणार्यांना प्रमाणपत्रे आणि खास भेटवस्तू

नोंदणी कशी कराल?

१. दिलेला QR Code स्कॅन करा किंवा 8806333789 या व्हाट्सअप नंबर वर Hi मेसेज करा
२. आपण घरचा गणपती कि सोसायटी गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होत आहात ते निवडा
३. आपले नाव व पत्ता पाठवा
४. यानंतर सजावटी चे फोटो / व्हिडीओ अपलोड करा
५. आपले लोकेशन शेयर करा
६. आपली माहिती अपलोड झाल्यावर एक नोंदणी क्रमांक मिळेल
७. स्पर्धेचा निकाल व इतर माहिती 8806333789 या नंबर द्वारे दिली जाईल

संपर्क क्रमांक: 8806333789

अधिक माहिती साठी:
कृपया दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. आम्ही आपल्या प्रश्नांची तत्परतेने उत्तरे देऊ.

या गणेशोत्सवात सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या सर्जनशीलतेने सणाला एक नवीन रंग द्या.
आपल्या गणपतीच्या आगमनाला आपल्या सजावटीने सर्वोत्तम बनवूया!